किल्ले रायगड : मराठा साम्राज्यातील राजधानी किल्ल्याला मनाचा मुजरा
किल्ले रायगड
रायगडाचा माथा राजधानी
बनवण्यास सोयीचा व पुरेसा
आहे. शत्रूला अवघड
वाटणाऱ्या प्रदेशातले ते अधिक
अवघड ठिकाण आहे.
सागरी दळणवळणासही हे
ठिकाण जवळ आहे.
म्हणून महाराजांनी राजधानीसाठी या
गडाची निवड केली. सभासद बखर म्हणते,
‘राजा खासा जाऊन
पाहता गड बहुत
चखोटा. चौतर्फा गडाचे कडे
तासिल्याप्रमाणे दिड गांव
उंच. पर्जन्यकाळी कडियावर
गवत उगवत नाही
आणि धोंडा तासीव
एकच आहे. दौलताबाद
पृथ्वीवर चखोट गड
खरा, परंतु तो
उंचीने थोडका. दौलताबादचे द्शगुणी गड उंच
असे देखोन बहुत
संतुष्ट झाले आणि
बोलिले. तक्तास जागा हाच
गड करावा’. याच
दुर्गदुर्गेश्वराला १५ विविध
नावांनी संबोधिले गेले आहे.
१. रायगड, २.
रायरी, ३. इस्लामगड,
४. नंदादीप, ५.
जंबुद्विप, ६. तणस,
७. राशिवटा, ८.
बदेनूर, ९. रायगिरी,
११. भिवगड, १२
रेड्डी, १३. शिवलंका,
१४. राहीर, १५.
पूर्वेकडील जिब्राल्टर शिवराज्याभिषेक.
४. वाघ्या कुत्राची समाधी : इतिहासात
असे म्हटले जाते
की शिवाजी महाराजाचा
अत्यसंस्कार चालू होता
तेव्हा शिवाजीच्या वाघ्या नावाचा
कुत्र्याने त्या आगीत
उडी घेतली.
७. नगारखाना : सिंहासनाच्या
समोर जे भव्य
प्रवेशद्वार दिसते तोच हा
नगारखाना. हे बालेकिल्ल्याचे
मुख्य प्रवेशद्वार आहे.
नगारखान्यातून पायऱ्या चढून वर
गेले की माणूस
किल्ल्यावरील सर्वाधिक उंचीवर असतो.
८. बाजारपेठ : नगारखान्याकडून डावीकडे उतरून आले की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ‘होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवाजीच्या काळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. दोन रांगांमधून जवळजवळ चाळीस फूट रुंदीचा रस्ता आहे.
९. राजभवन : राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे. १३. रत्नशाळा : राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबतखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.
१०. राजसभा : महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला, तीच ही राजसभा. राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखर म्हणते, ‘तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले. नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती, त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली.’
किल्ले रायगड हा महाराष्ट्रातील
रायगड जिल्ह्यातील सह्याद्रीच्या
पर्वतरांगांत असून समुद्रसपाटीपासून
सुमारे ८२० मीटर
(२७०० फूट) उंचीवर
आहे. मराठी साम्राज्याच्या
इतिहासामध्ये त्याची एक खास
ओळख आहे. छत्रपती
शिवाजीराजांनी रायगडचे स्थान आणि
महत्त्व पाहून १७ व्या
शतकात याला आपल्या
राज्याची राजधानी बनविली. शिवराज्याभिषेक
याच ठिकाणी झाला.
इंग्रजांनी गड कब्जात
घेतल्यानंतर लुटून त्याची नासधूस
केली.
हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात रायगडाचे स्थान
सर्वश्रेष्ठ आहे. महाडच्या
उत्तरेस २५ कि.मी. वर
हा किल्ला असून
याची समुदसपाटी पासूनची
उंची २८५१ फूट
आहे. रायगड हा
चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. याच्या
उत्तरेला आणि पूर्वेला
काळ नदीचे खोरे
पसरलेले आहे. तर
पश्चिमेला गांधारी नदी वाहते.
याच्या पूर्वेला लिंगाणा, आग्नेयाला
आकाश स्वच्छ असेल
तर राजगड, तोरणा
दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा,
उत्तरेला कोकणदिवा असा मुलूख
दिसतो. रायगडपासून मुंबई, पुणे,
सातारा ही शहरे
सारख्याच अंतरावर आहेत. सह्याद्रीतील
किल्ल्यांच्या रांगांतील हा एक
दुवा आहे. रायगड
हा निसर्गतःच डोंगरांनी
वेढलेला असल्यामुळे ( तसेच) शत्रूच्या हल्ल्यापासून
बचाव व्हावा यासाठी
पुणे सोडून पश्चिम
डोंगरात रायगड ही राजधानी
महाराजांनी निवडली.
रायगडाचे प्राचीन नाव ‘रायरी’
हे होते. युरोपचे
लोक त्यास ‘पूर्वेकडील
जिब्राल्टर’ असे म्हणत
असत. जिब्राल्टरचे ठाणे
जितके अजिंक्य तितकाच
रायगड अजिंक्य व
दुर्गम. पाचशे वर्षांपूर्वी त्यास
गडाचे स्वरूप नव्हते
व तो नुसता
एक डोंगर होता,
तेव्हा त्यास ‘रासिवटा’ व
‘तणस’ अशी दोन
नावे होती. त्याचा
आकार, उंची व
सभोवतालच्या दऱ्या यावरून त्यास
‘नंदादीप’ असेही नाव पडले.
निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी
ठेवण्यापुरता होई. मोऱ्यांचा
प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून
पळून रायगडावर जाऊन
राहिला तर प्रतापराव
मोरे विजापुरास पळाला.
महाराजांनी ६ एप्रिल
१६५६ रोजी रायरीस
म्हणजेच रायगडास वेढा घातला
व मे महिन्यात
रायरी महाराजांच्या ताब्यात
आली. तेथे असताना,
कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद
खजिना घेऊन विजापूरकडे
निघाल्याची बातमी महाराजांना समजली.
त्यांनी तो खजिना
लुटून रायगडावर आणला
व त्या खजिन्याचा
उपयोग गडाच्या बांधकामासाठी
केला.
शिवराज्याभिषेक हा रायगडाने
अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग महाराजांचा
राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे
तर भारताच्या इतिहासातील
एक लक्षणीय घटना.
ता. १९ मे
१६७४ रोजी राज्याभिषेकादि
विधीपूर्वी महाराजांनी प्रतापगडाच्या भवानीचे
दर्शन घेतले. हा
राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या
हस्ते पार पडला. तीन मण
सोन्याचे म्हणजेच ५६ हजार
किंमतीचे छत्र देवीला
अर्पण केले. गडावरील
राजसभेत ता. ६
जून १६७४ ज्येष्ठ
शुद्ध १३ शके
१५९६, शनिवार या
दिवशी राज्याभिषेक संपन्न
झाला. ता. २४
सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी
अश्विन शु. ५
आनंद संवत्सर शके
१५९६ या दिवशी
तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वतःला
आणखी एक राज्याभिषेक
करून घेतला. या
मागचा खरा हेतू
हा जास्तीत जास्त
लोकांना समाधान वाटावे हा
होता.
रायगडावरील अश्मयुगीन गुहा
पुण्याहून रायगडापर्यंत
जाण्यासाठी थेट बससेवा आहे.
ही बस पुण्यातून भोरमार्गे वरंधा
घाटातून महाडमार्गे पाचाड गावातून रायगडच्या दोरवाटेच्या (रोप
वेच्या) तळावरून पाचाड
खिंडीत येते. येथून
पायउतार होऊन अवघ्या १४३५
पायऱ्या चढून गेले, की
रायगडमाथा गाठता येतो. पण
या पाचाड खिंडीतच रायगडाच्या विरुद्ध दिशेस
अवघ्या ४-५
मिनिटांच्या चढणीवर एक गुहा
आहे. तिला म्हणतात "वाघबीळ' किंवा
"नाचणटेपाची गुहा.'
नवे ट्रेकर्स या
गुहेला "गन्स ऑफ पाचाड'
असे म्हणू लागले
आहेत.
जगातील
इतर सर्व गुहांपेक्षा या
गुहेची रचना पूर्ण
वेगळी आहे. पाचाड
खिंडीतून येथवर चढून आले
की गुहेचे एक
तोंड दिसते. या
तोंडातून आत गेले की
समोर येणारे दृश अचंबित करणारे
आहे. दोन गोलाकृती प्रचंड
भोके पलीकडील बाजूला
आहेत. तिथवर गेले,
की पाचाडचा भुईकोट
किल्ला, पाचाड
गाव व पाचाडपासून ते
पाचाड खिंडीकडे येणारा
घाटरस्ता व्यवस्थित पाहता येतो.
या
गुहेत सतत एकापाठोपाठ येणाऱ्या थंड
वाऱ्याच्या झुळका आपला सारा
थकवा दूर करतात.
ज्या अर्थी अश्मयुगीन मानवाची इथे
वस्ती होती. त्याअर्थी इथे
जवळपास बारमाही पाण्याचे एखादे
नैसर्गिक ठिकाण निश्चित
असणार. रायगड पाहायला शेकडो-हजारो दुर्गयात्रींना या
वाघबीळ गुहेची कल्पनाच नसते.
अश्मयुगीन मानवाचे जुने
वसतीस्थान, ३ तोंडे असणारी
गुहा, तेथून दिसणारा उत्कृष्ट देखावा,
सतत वाहणारा थंड
वारा यांची अपूर्वाई येथे
भेट देणाऱ्याला जाणवते.
गडावरील पाहण्यासारखी काही खास ठिकाणे
१. पाचाडचा जिजाबाईंचा वाडा : उतारवयात
जिजाबाईंना गडावरची थंड हवा,
वारा मानवत नसे,
म्हणून महाराजांनी त्यांच्यासाठी पाचाडजवळच
एक वाडा बांधून
दिला. तोच हा
मासाहेबांचा राहता वाडा. वाडाची
व्यवस्था ठेवण्यासाठी काही अधिकारी
तसेच शिपायांची व्यवस्थाही
महाराजांनी केली होती.
पायऱ्यांची एक उत्तम
विहीर, तसेच जिजाबाईंना
बसण्यासाठी केलेले दगडी आसन
बघण्यासारखे आहे. यास
‘तक्क्याची विहीर’ असेही म्हणतात.
जिजाबाईंची समाधी.
२. हिरकणी टोक : गंगासागराच्या
उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी
वाट जाते ती
हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी
टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची
एक कथा सांगितली
जाते. या बुरुजावर
काही तोफाही ठेवलेल्या
दिसतात. बुरुजावर उभे राहिले
तर डाव्या हाताला
गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला
काळ नदीचे खोरे
दिसते. तसेच इथून
पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद
मोर्चा ही ठिकाणे
तोफेच्या माऱ्यात आहेत. त्यामुळे
युद्धशास्त्राच्या तसेच लढाऊ
दृष्टीने ही खूप
महत्त्वाची आणि मोक्याची
जागा आहे.
३. महाराजांची समाधी : मंदिराच्या
पूर्वदरवाजापासून थोडा अंतरावर
जो अष्टकोनी चौथरा
दिसतो तीच महाराजांची
समाधी. सभासद बखर म्हणते,
‘क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती
यांचा काल शके
१६०२ चैत्र शुद्ध
१५ या दिवशी
रायगड येथे झाला.
देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला
जगदीश्वराचा जो प्रासाद
त्याच्या महाद्वाराच्या बाहेर दक्षणभागी केले.
तेथे काळ्या दगडाच्या
चिऱ्याचे सुमारे छातीभर उंचीचे
अष्टकोनी जोते बांधिले
असून वरून फरसबंदी
केलेली आहे. फरसबंदीच्या
खाली पोकळी आहे,
तीत महाराजांचा अवशिष्टांश
रक्षामिश्र मृत्तिकारूपाने सापडतो.’ दहनभूमी पलीकडे
भग्न इमारतींच्या
अवशेषांची एक रांग
आहे, ते शिबंदीचे
निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे
सदर वस्तीपासून विलग
असा एक घराचा
चौथरा दिसतो. हे
घर इ.स.
१६७४ मध्ये इंग्रज
वकील हेनरी ऑक्झेंडन
यास राहावयास दिले
होते. महाराजांच्या समाधीच्या
पूर्वेकडे भवानी टोक आहे
तर उजवीकडे दारूची
कोठारे, बारा टाकी
दिसतात.
५. टकमक टोक : बाजारपेठेच्या
समोरील टेपावरून खाली उतरून
टकमक टोकाकडे जाता
येते. तेथेच एका
दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात.
जसजसे टोकाकडे जावे
तसतसा रस्ता निमुळता
होत जातो. उजव्या
हाताला सरळ तुटलेला
२६०० फूट खोल
कडा आहे. टोकावर
वारा प्रचंड असतो
व जागाही कमी
असल्यामुळे गोंधळ न करता
सावधानता बाळगावी लागते.पेशवे
राज्यकाळात या ठिकाणावरून
गुन्हेगारांचा कडेलोट केला जाई.
६. जगदीश्वर मंदिर : बाजारपेठेच्या
खालच्या बाजूस पूर्वेकडील उतारावर
ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष
दिसतात. तेथूनच समोर जे
भव्य मंदिर दिसते
तेच महादेवाचे म्हणजे
जगदीश्वराचे मंदिर. मंदिरासमोर नंदीची
भव्य आणि सुबक
मूर्ती आहे. पण
सध्या ही मूर्ती
भग्रावस्थेत आहे. मंदिरात
प्रवेश केला की
भव्य सभामंडप लागतो.
मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव
आहे. गाभाऱ्याच्या भिंतीस
हनुमंताची भव्य मूर्ती
दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या
खाली एक लहानसा
शिलालेख दिसतो. तो पुढीलप्रमाणे,
‘सेवेचे ठायी तत्पर
हिरोजी इटळकर’ या दरवाजाच्या
उजव्या बाजूस भिंतीवर एक
सुंदर शिलालेख दिसतो
तो पुढीलप्रमाणे - श्री
गणपतये नमः। प्रासादो
जगदीश्वरस्य जगतामानंददोनुज्ञया श्रीमच्छत्रपतेः शिवस्यनृपतेः सिंहासने तिष्ठतः। शाके
षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे
ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ॥१॥
वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ
स्तभेः कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते
। श्रीमद्रायगिरौ गिरामविषये
हीराजिना निर्मितो यावच्चन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते
॥२॥ याचा थोडक्यात
अर्थ पुढीलप्रमाणे -’सर्व
जगाला आनंददायी असा
हा जगदीश्वराचा प्रासाद
श्रीमद् छत्रपती शिवाजी राजां
यांच्या आज्ञेने शके १५९६
मध्ये आनंदनाम संवत्सर
चालू असताना सुमुहुर्तावर
निर्माण केला. या रायगडावर
हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी,
तळी, बागा, रस्ते,
स्तंभ, गजशाळा, राजगृहे आशांची
उभारणी केली आहे.
ती चंद्रसूर्य असेतोवर
खुशाल नांदो.’
८. बाजारपेठ : नगारखान्याकडून डावीकडे उतरून आले की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ‘होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवाजीच्या काळातील बाजारपेठ. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत. दोन रांगांमधून जवळजवळ चाळीस फूट रुंदीचा रस्ता आहे.
९. राजभवन : राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या मकानांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आहे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे. १३. रत्नशाळा : राजप्रासादाजवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबतखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.
१०. राजसभा : महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला, तीच ही राजसभा. राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखर म्हणते, ‘तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले. नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती, त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली.’
किल्ले रायगड : मराठा साम्राज्यातील राजधानी किल्ल्याला मनाचा मुजरा
Reviewed by SRaj
on
03:54
Rating:
Reviewed by SRaj
on
03:54
Rating:












No comments