राजर्षी शाहू महाराज : एक थोर सामाजिक विचारधारक व त्यांची कार्ये







जन्मतारीख :-२६  जून  १८७४
जन्म स्थळ :- कागल ( कोल्हापूर )
नाव :- यशवंतराव जयसिंगराव घाटगे 
मृत्यू :- ६ मे १९९२ ( मुंबई )





चौथे शाहू, अर्थात राजर्षी छत्रपती शाहू महाराज, ( जून २६, इ. स. १८७४ ते मे ६, इ. स. १९२२ ) हे कोल्हापूर राज्याचे .. १८८४-१९२२ सालांदरम्यान छत्रपती होते. शाहू महाराज प्रभावी समाजसुधारक होते.

शाहू महाराजांचा जन्म  जून २६, इ. स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे अप्पासाहेब तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्चइ. स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, शाहू हे नाव ठेवले. २ एप्रिल, इ. स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर .. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते. मुंबई येथे ६ मे , इ. स. १९२२ रोजी त्यांचे निधन झाले.

शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षणप्रसार करण्यावर विशेष भर दिला. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे मोफत केले. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी .. १९१९ साली सवर्ण अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची पद्धत बंद केली. जातिभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. .. १९१७ साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवाविवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी  त्यांनी .. १९१६ साली निपाणी येथेडेक्कन रयत असोसिएशनही संस्था स्थापली.

राजर्षी शाहूं महाराज कलाप्रेमी होते व त्यांनी कोल्हापूर संस्थानात संगीत, चित्रपट, चित्रकला, लोककला आणि कुस्ती या क्षेत्रांतील कलावंतांना राजाश्रय देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे महत्कार्य केले.


महाराजानी कोल्हापूर, बेळगाव या भागातील स्वातंत्र्यवीराना वेळोवेळी आर्थिक इतर मदत केली. शाहू महाराज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संबंध सर्वश्रृत आहे. डॉ. बाबासाहेबांनीमूकनायकहे साप्ताहिक ३१ जानेवारी १९२० ला प्रथम प्रकाशित केले. परंतु आर्थिक अडचणीमुळे पुढे ते बंद पडले. परंतु हे राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यावर त्यांनी तात्काळ २५०० रुपयांची भरघोस मदत केली

शाहू महाराजानी समतेवर आधारीत राज्य निर्माण केले. त्यामुळे जातीयवादी समाजकंटक लोकानी महाराजाना ठार मारण्याचे प्रयत्न केले. एकदा मारेकरी पाठवून आणि एकदा बाँब फेक करुन महाराजाना दगा करायचा प्रयत्न केला गेला. पण जनतेचे प्रेम आणि दुवा यांच्या पुण्याईने महाराज सुखरूप राहिले. महाराजाना बदनाम करायचेही अनेक प्रयत्न झाले. पण शत्रुंचे सारे प्रयत्न विफल ठरले.


 महाराजांचे शिक्षण
*1985 ते 1894 या काळात शैक्षणिक कार्य पूर्ण केले
*1894
सर फ्रेजर यांच्या मार्गदर्शनाखाली धारवाड येथे शिक्षण घेतले
*1898
पर्यंत राजकोट येथे Principal McNoton यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतले.

* 1891- श्रीमंत लक्ष्मीबाईसाहेब  यांच्याशी विवाह झाला. 
 


* 2 एप्रिल 1894 रोजी राज्याभिषेक समारंभ झाला.

*1894 -
राजे झालेनंतर लगेचंच त्यांनी बहुजन समाजातून तलाठ्याच्या नेमणुका करण्याचा अध्यादेश काढला
वेठबिगाराची पद्धत बंद केली.

* 1895
साली मोतीबाग तालीम सुरु केली. शाहू महाराजांना कुस्ती हा खेळ आवडत असे. याच वर्षी शाहूपुरी गुळाची व्यापार पेठ सुरु केली.

* 27
मार्च 1895 - पुणे येथील फर्गुसन महाविद्यालयाच्या नव्या इमारतीचे  उद्घाटन केले.

* 1887 -
आळते महार स्कूल ची स्थापना केली, दुष्काळ पिडीत शेतकऱ्यांना कर्ज दिले.

* 1899 -
वेदोक्त प्रकरण याच वर्षी घडले. तेंव्हापासून ब्राम्हणांच्या मक्तेदारीस शह देण्यासाठी आणि त्यांच्याकडून बहुजनांची होणारी गळचेपी थांबवण्यासाठी बहुजन उद्धाराचे कार्य हाती घेतले. वेदोक्त प्रकरणात ब्राम्हणांचे समर्थन केले.

* 1901
साली मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी 'व्हिक्टोरिया मराठा बोर्डिंग' या बोर्डिंग ची स्थापना कोल्हापुरात केली. याच वर्षी नाशिक येथे उदोजी विद्यार्थी वसतीगृहाची स्थापना केली. तसेच गोवध बंदी कायदा केला.

* 20
जुलै 1902 रोजी संस्थानामध्ये नोकरी मध्ये 50% आरक्षण देण्याचा आदेश काढला

* 9
नोव्हेंबर 1906 रोजी 'किंग एडवर्ड मोहमेडन एज्युकेशन सोसायटी' ची स्थापना कोल्हापूर येथे केली. तसेच शाहू मिल तथा 'शाहू स्पिनिंग अंण्ड विव्हिंग मिल' ची सुरुवात केली.

* 1907
सहकारी तत्वावर कापड गिरणी सुरु केली. अस्पृश्य समाजातील विद्यार्थ्यांसाठी 'मिस क्लार्क बोर्डिंग हाउसची ' स्थापना केली.

* 1908
बॉंबस्फोट घडवून महाराजांना मारण्याचा अयशस्वी प्रयत्न समाजकंटकांकडून केला गेला.

* 1910
जहागीरदारांचे अधिकार कमी केले

* 11
जानेवारी 1911 साली कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची स्थापना केली. अध्यक्ष म्हणून परशुराम  घोसटवाडकर तर प्रमुख म्हणून भास्करराव जाधव हे काम पाहत. याच वर्षी विद्यार्थ्यांना 15% नादारी देण्याची घोषणा केली.
 -शिक्षकांसाठी प्रशिक्षण देण्याची योजना गुणवत्तेनुसार पदोन्नती देण्याची योजना सुरु केली.
 -
कोल्हापुरात राधानगरी तालुक्यात भोगावती नदीवर राधानगरी धरण बांधले.
 -
सत्यशोधक समाजाचे अधिवेशन पुणे येथे भरवले


* 1912 -
खासबाग मैदान या कुस्ती मैदानाची सुरुवात कोल्हापूर येथे केली. (याला 2012 साली 100 वर्षे पूर्ण झाली).
      -
सहकारी कायदा केला  सहकार चळवळीला प्रोत्साहन दिले.
      -
सत्यशोधक समाजाचे अधिवेशन नाशिक येथे भरवले

*1913
गाव तिथे शाळा असावी असा अध्यादेश काढला. पाटील शाळांची सुरुवात केली.
      -
कोल्हापुरात सत्यशोधक समाजाची शाळा सुरु केली.

* 1916
साली संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे आणि मोफत केले
      -
बहुजन समाजाला राजकीय हक्क मिळवून देण्यासाठी 'डेक्कन रयत शिक्षण संस्थे'ची स्थापना निपाणी या ठिकाणी केली.
      -
आर्य समाजाची तत्त्वे याच वर्षी स्वीकारली.

* 1917
विधवांच्या पुनर्विवाहास कायद्याने मान्यता दिली
      - 25-
जुलै पासून संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचे केले.

* 1918
आंतरजातीय  विवाहास कायद्याने मान्यता दिली
      -
कुलकर्णी महार वतने रद्द केली.
      -
जमिनी रयतवारीने कसण्यास दिल्या
      -
आर्य समाजाची शाखा कोल्हापुरात सुरु करून राजाराम कॉलेज या संस्थेकडे चालवण्यास दिले.
      -
गुन्हे गारी जमातीच्या लोकांची पोलीस हजेरी बंद केली.
      - 
तलाठी शाळा सुरु केल्या.

 * 1919 -
स्त्रीयांवर होणाऱ्या अन्यायांविरुद्ध कठोर कायदा केला.
      -
एप्रिल 1919 - कानपूर - "अखिल भारत वर्षीय कुर्मी क्षत्रिय महासभा" या संस्थेच्या 13 व्या
       
अधिवेशनात त्यांच्या अतुल्य कार्याबद्दल "राजर्षी" पदवी बहाल करण्यात आली.
      -
शाळेत अस्पृश्यता पाळण्यास मनाई करणारा कायदा केला.

 * 1920 -
घटस्फोटाचा कायदा करण्यात आला
       -
देवदाशी प्रथा कायद्याने बंद करण्यात आली
       -
हुबळी - "ब्राम्हणेतर सामाजिक परिषद" चे अध्यक्षपद भूषवले
       -
पूजाअर्चा शिकाऊ उमेदवाराकडून करावी असा आदेश काढला

 *  6
मे  1922 रोजी मुंबई येथे निधन.
 
राजर्षी शाहू महाराज : एक थोर सामाजिक विचारधारक व त्यांची कार्ये राजर्षी शाहू महाराज :  एक थोर सामाजिक विचारधारक व त्यांची कार्ये Reviewed by SRaj on 06:10 Rating: 5

No comments