आषाढी एकादशी म्हणजे नेमकं काय.??
आषाढी एकादशी
आषाढ महिन्यात किमान दोन एकादश्या असतात. आषाढ शुद्ध एकादशी आणि आषाढी वद्य एकादशी. तिथीच्या वृद्धी झाली, किंवा अधिक मास असेल तर आणखीही एकादश्या असू शकतात.
तिथीची वृद्धी
देवशयनी एकादशी, स्मार्तांची एकादशी, भागवत एकादशी अशा, तिथी वृद्धी या चांद्रमास गणनेतील फरकामूळे होतात. अधिक मास आल्यास अधिक मासाच्या आणखी दोन एकादश्या येतात. अधिक महिन्यात येणाऱ्या दोनही एकादश्यांना कमला एकादशी हेच एकमेव नाव असते.
आषाढ शुद्ध एकादशी
आषाढी शुद्ध एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी. है दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्रात काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठल नामचा गजर करीत पंढरपुरास पायी चालत येतात. चन्द्रभागेत स्नान करुन विठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव येथून पूर्णब्रम्हधिकारी श्री संत गजानन महाराज्यांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूतून तुकारामाची, त्रंबकेश्वरहुन निवृत्तिनाथांची, पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराचि पालखी येते. आषाढीच्या वारीस सुगीची उपमा दिलेली आहे. ज्याप्रमाणे शेतकरी सुगीस धान्य भरतो व वर्षभर वापरतो. त्याचप्रमाणे आषाढीवारीच्या दिवशी पंढरीच्या प्रेमनगरी वारकरी प्रेमाची साठवण करतो व तेच वर्षभर व्यवहारात वापरतो.

आषाढी एकादशीचे महत्व्य
पौराणिक काली मुदुमान्य नावाच्या राक्षसाला भगवान शंकरांची आराधना करून तुला कोणाकडूनही मृत्यू येणार नाही. फक्त एक स्त्रीच्या हातून मृत्यू येईल असा वर मिळतो. त्यामुळे उन्मत्त होऊन मुदुमान्य राक्षस देवांवर स्वारी करतो व त्यांचा पराभव करतो. सर्व देव पराभव होऊन एका गुहेत लपतात. त्याच वेळी एकादशी देवतेचा जन्म होतो व ती मुदुमान्य राक्षसाचा नाश करून देवांची मुक्तता करते. त्यावेळी पाऊस पडत असल्यामुळे सर्व देवांचं स्नान होते व गुहेत असल्यामुळे उपवासही घडतो. त्या दिवसापासून एकादशीचे व्रत उपवास म्हणून करण्याचा प्रघात पडला. परस्परांवर प्रेम करणे, प्राणिमात्र, अपंगांवर प्रेम करणे, गरजवंतांना मदत करणे हि शिकवण हा दिवस आपल्याला देतो. मराठी हिंदूंच्या दृष्टीने हा एक अत्यंत पवित्र दिवस आहे.
आषाढी एकादशी म्हणजे नेमकं काय.??
Reviewed by SRaj
on
05:26
Rating:
Reviewed by SRaj
on
05:26
Rating:

No comments