८२ देशांचा राजा शिवरायांना अभिवादन करताना… मालोजीराव जगदाळे यांचा लेख...!!



शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे आज ९० व्या वर्षांत पदार्पण

नोव्हेंबर १९, १९२१ सालीशिवाजी कि जय , शाहू कि जयच्या गजरात, छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि हजारो पुणेकरांच्या उपस्थितीत ८२ देशांचा सर्वेसर्वा असलेल्या प्रिन्स ऑफ वेल्स ने छत्रपती शिवरायांना अभिवादन करत भारतातल्या पहिल्या भव्य स्मारकाचे भूमिपूजन केले. प्रिन्स ऑफ वेल्स ने शिवरायांचा उल्लेख “Shivaji not only founded an Empire, but created a Nation.” अश्या गौरवपूर्ण शब्दात केला त्याला उत्तरादाखल राजश्री शाहू म्हणालेहे घडू शकले कारण,मराठे हे जन्मापासूनच लढवय्ये असतात. ”
 

 
शिवाजी महाराज्यांचा सर्वात पहिला पुतळा

१० नोव्हेंबर १९१७ रोजी राजर्षी शाहू महाराजांनी दिल्लीत शिवाजी स्मारकाची घोषणा केली आणि नोव्हेंबर १९, १९२१ साली स्मारकाचे भूमिपूजन झाले. दुर्दैवाने मे १९२२ साली राजर्षी शाहूंचे निधन झाले परंतु त्यांचे स्वप्न महाराजा माधवराव शिंदे (मृत्यू १९२५) आणि त्यांच्यानंतर गादीवर आलेले छत्रपती राजाराम आणि पुतळ्याच्या उभारणीस झटणारे ५०० कामगार यांनी पूर्ण केले , ,६५,००० रुपये खर्चून उभा राहिलेल्या या भव्य पुतळ्याचे १६ जून १९२८ रोजी अनावरण झाले. राजर्षी शाहूंच्या स्वप्नातून उभा राहिलेला हा शिवरायांचा भव्य पुतळा आजही पाहताना नकळतच शाहुराजांना नमन करायला मान खाली झुकते !
 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या देखण्या पुतळ्याची कहाणी तितकीच रोमहर्षक आहे...!!

शिवाजीनगर येथील श्री शिवाजी प्रिपरेटरी मिलिटरी स्कूलच्या (एसएसपीएमएस) आवारातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा शुक्रवारी (१६ जून) ९० व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या सूचनेनुसार ज्येष्ठ शिल्पकार विनायक करमरकर यांनी संपूर्ण ओतीव काम करून ब्राँझमध्ये घडविलेला हा पुतळा भारतामध्ये सवरेत्कृष्ट मानला जातो.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या या देखण्या पुतळ्याची कहाणी तितकीच रोमहर्षक आहे. पुण्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अश्वारूढ पुतळा असावा, अशी छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची इच्छा होती. त्यासाठी त्यांनी म्हात्रे नावाच्या शिल्पकाराला पाचारण केले होते. मात्र, काही कारणांनी म्हात्रे यांच्याकडून हे काम होऊ शकले नाही. त्यामुळे शाहू महाराजांनी ज्येष्ठ शिल्पकार विनायक करमरकर यांना निमंत्रित केले होते. करमरकर यांनी मुंबई येथे हा अश्वारूढ पुतळा घडविला. हा पुतळा संपूर्णपणे ओतीव काम करून ब्राँझमध्ये घडविण्यात आला आहे. हा पुतळा मुंबईहून रेल्वेने पुण्यात आणण्यात आला होता. त्या वेळी रेल्वेला एक खास डबा जोडून त्याद्वारे हा पुतळा पुण्यामध्ये दाखल झाला. रेल्वेच्या प्रवासात खंडाळ्याच्या घाटामध्ये सर्वात कमी उंचीचा बोगदा आहे, त्या बोगद्यापेक्षा या पुतळ्याची उंची जेमतेम तीन-चार इंच कमी होती. त्यामुळे हा पुतळा अगदी काळजीपूर्वक पण सहीसलामत पुण्यामध्ये येऊ शकला.  

एसएसपीएमएस शाळेच्या आवारात १६ जून १९२८ रोजी या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते, अशी माहिती ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांनी दिली. शिल्पकार विनायक करमरकर हे मूळचे कोकणातील अलिबागजवळील सासवणे गावचे. आपल्या आयुष्यात त्यांनी अनेक शिल्पे घडविली असली तरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे निर्माते हीच त्यांची ओळख प्रस्थापित झाली होती.

 

८२ देशांचा राजा शिवरायांना अभिवादन करताना… मालोजीराव जगदाळे यांचा लेख...!! ८२ देशांचा राजा शिवरायांना अभिवादन करताना… मालोजीराव जगदाळे यांचा लेख...!! Reviewed by SRaj on 04:30 Rating: 5

No comments